file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील खरवंडी व परीसरातील गावात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने नऊ दिवसाचा बंद पाळावा. कोरोनाचे नियम तोडणारे, विवाहनिमित्त गर्दी करणारे, अवैध व्यावसाईक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

हिवरेबाजार सारखा पॅटर्न वापरुन कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी भोसले यांनी ग्रामस्थांशी सवांद साधत कोरोना वाढण्याचे कारणे विचारली. पत्याचे क्लब, अवैध धंदे जोमात असणे,

मास्क न वापरणे, कोरोना टेस्टींग न करणे, कोरोना बाधीत घरीच थांबणे अशी कारणे समोर आली. खरवंडी येथील शासकिय कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचे आदेश भोसले यांनी स्थानिक यंत्रणेला दिले. कोरोना बाधीतांच्या घरावर स्टीकर चिकटविण्यात येणार आहे.

कोरोना बाधीत हा कोवीड सेंटरमधेच उपचार घेईल त्याला घरी सोडले जाणार नाही. हिवरे बाजार पँटर्न राबवुन कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले जातील असे राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

तालुका महसूल, पोलिस, पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या कोरोना नियंत्रणाच्या कामकाजावर नाराजी भोसले यांनी व्यक्त केली.