Maharashtra News:मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद सुरू असतानाच इकडे भगवानगडावरील पूर्वी मिटलेला दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा उद्भवान्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आपण भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘मी वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे.

७ ते ८ वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाही. जी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा यंदा परत सुरू करणार आहे,’ असे त्या म्हणाल्या आहेते.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून भगवान गडावर घेण्यात येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता.

गडाचे महंत विरूद्ध मुंडे असा वाद झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांना मेळाव्याचे ठिकाण बदलले आहे. त्यामुळे आता गडावर कोणताही राजकीय मेळावा होत नाही.

आता नव्याने राजकीय चर्चेत आलेल्या करुणा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची घोषणा हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.