file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरारातील शिवाजी चौकातील एका 18 वर्ष वयाच्या तरुणीची व वडीलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने जन्मदात्या आईनेच नग्न फोटो,व्हिडीओ,अश्लील चँटींग याचे स्टेटस ठेवत असल्याने जन्मदात्या आई विरोधात मुलीने गुन्हा दाखल केला आहे.

खुद्द आईनेच हे कृत्य केल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राहुरी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीने राहुरी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत या तरुणीने सांगितले की,माझी आई पाच वर्षापुर्वी वडीलांशी वाद घालून घर सोडून निघून गेली आहे.

नातेवाईकांमार्फत समक्षोता करण्याचा प्रयत्न केला.परंतू समक्षोता झाला नाही. आम्ही भावंडे भेटण्यास गेलो असता आम्हाला वाईट शिवीगाळ करुन मारहाण करण्यास अंगावर धावून येते.आमची बदनामी करण्यासाठी आमची जन्मदाती आई तिच्या मोबाईलवर नग्न फोटो,व्हिडीओ,अश्लील चँटींग याचे स्टेटस ठेवून नातेवाईकांत आमची बदनामी करत आहे.

हा प्रकार फेब्रुवारी 2020 पासुन करीत असुन या स्टेटस बाबत माझ्या वडीलांना कोणतीही माहिती नव्हती.आमचे नातेवाईक व माझ्या मैञिणींने मला याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर मी वडीलांना याची माहिती दिली.माझी व वडीलांची बदनामी करण्याच्या हेतूने स्टेटस ठेवले जात असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थीनीने पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहे.