अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  आलेल्या एका महिलेस ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे नुकतेच समोर आले होते. मात्र आता त्यापाठोपाठ तिच्या लहान मुलाला देखील ओमायक्राॅनचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिली.(Omicron News)

यामुळे आता जिल्ह्यात ओमायक्राॅनचे दोन रुग्ण आढळुन आले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या मायलेकाच्या संपर्कातील सुमारे ५५ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

दि.१५ डिसेंबर रोजी नायजेरिया देशातुन श्रीरामपूरला आलेली ४१ वर्षीय महिला व सहा वर्षाचा मुलगा यांची कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे त्याचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले. या मायलेकाच्या संपर्कात आलेल्या ५५ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी केले आहे.