file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या श्रीरामपूरच्या मद्यधुंद युवकांनी २३ जुलैला कोलटेंभे येथील स्थानिक नागरिकांच्या चहाच्या टपरीवजा दुकानची मोडतोड केली.

तसेच एका आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी श्रीरामपूर येथील सहा तरुणांना अटक केली. पण या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप वाढला आहे. पर्यटकांनी आदिवासी बांधवांच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तवेरा वाहन क्रमांक एमएच २० बीएन, ६१९२ मधून आलेल्या श्रीराम केशव जंगले (वय २६), अक्षय प्रभाकर गाडेकर (वय २८), उमेश अशोक धनवटे (वय ३१), सुमीत दत्तात्रय वेताळ (वय २७), वैभव किशोर हिरे (वय २४),

विशाल रामकृष्ण वेताळ (वय २४) यांना वाहनासह ताब्यात घेतले. त्यांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पण, हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप कायम आहे.