Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात पावसासाठी (Maharashtra Rain) पोषक वातावरण तयार होत आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची (Monsoon) उघडीप बघायला मिळत आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांत आता पावसाची (Monsoon News) उघडीप बघायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी झाला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात महाराष्ट्रातील एकूण 22 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाबराव यांच्या मते 10 सप्टेंबर पासून राज्यात बदलत पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ म्हणजे विदर्भातील जवळपास अकरा जिल्ह्यात 12 सप्टेंबर 15 सप्टेंबर जोरदार पाऊस होणार आहे. तसेच आज पासून 12 सप्टेंबर पर्यंत राजधानी मुंबई तसेच कोकणातील किनारपट्टी भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.

याशिवाय उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात दहा तारखे पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजे 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर नासिक, धुळे नंदुरबार, जळगाव आणि राजधानी मुंबई या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

मित्रांनो आजपासून 14 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील नांदेड लातूर सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद हिंगोली अहमदनगर या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान 14 ते 16 सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

पंजाबराव यांनी सरतेशेवटी 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचे नमूद केले आहे. निश्चितच राज्यात काहीही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील होणार असल्याचा पंजाबराव यांनी अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी बांधवांना या कालावधीत सतर्क राहण्याचे तसेच आपल्या पिकांची काळजी घेण्याची देखील गरज भासणार आहे.