Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस (Rain) राज्यात चांगलाच बरसत होता. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे (Monsoon) राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.

अशा परिस्थितीत काही ठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर कमालीचा कमी झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याची माहिती दिली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही अधून मधून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असून 26 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप राहणार आहे.

26 सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवला आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे. आजपासून चार दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी पीक व्यवस्थापनाची सर्व कामे करून घ्यावीत. कारण की 26 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

27 सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असून हा पाऊस 4 ऑक्टोबर पर्यंत कायम राहणार आहे. मात्र या कालावधीत बरसणारा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा नसून रिमझिम स्वरूपाचा राहणार आहे. निश्चितच 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत पावसाची रिपरिप राज्यात पाहायला मिळणार आहे.

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या विभागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या दरम्यान राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली व अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे.