Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस (Rain) सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे (Maharashtra Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात कालपासून पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस (Monsoon News) बरसत आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर या पिकांच्या उत्पादनात यामुळे घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

काल राज्यात राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला. याशिवाय महाराष्ट्रातील जळगाव अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूक कोंडी देखील यामुळे बघायला मिळाली. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भात पुढील चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात पावसाची शक्यता आहे.

या संबंधित विभागाला भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनीदेखील आगामी काही दिवस महाराष्ट्रात कसं हवामान (Panjabrao Dakh Havaman Andaj) असेल याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार, 21 सप्टेंबर पासून नाशिक जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार असून पावसाची उघडीप राहणार आहे.

सांगली मध्ये देखील चार-पाच दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत महाराष्ट्राचा विचार करता 23 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. म्हणजेच राज्यातील काही जिल्हे वगळता 23 सप्टेंबर पर्यंत पाऊस राहणार. मात्र 24 सप्टेंबर पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

शिवाय पंजाबराव आणि वर्तवलेले आपल्या नवीन अंदाजानुसार 7 ऑक्टोबर पासून उत्तर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच आपल्या नवीन हवामान अंदाजात पंजाबराव यांनी दिवाळीमध्ये मराठवाड्यात विदर्भात आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्‍यता असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय या वर्षी 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याची बहुमूल्य माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.