अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर लगेच गुजरात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्य वर्धित कर (वॅट) सात-सात रुपये प्रति लीटर कमी केल्याने महाराष्ट्र राज्यापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोल १४ रुपयांनी स्वस्त झाले तर डिझेल ४ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तर यात धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांना गुजरात राज्यातील पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी केलेली जाहिरात बोर्ड सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे.

राज्य बदलले की प्रत्येक राज्याची कर आकारणीही बदलते. त्याची प्रचिती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये येत आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलवर वॅट दर गुजरात राज्यापेक्षा जास्त आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर, तळोदा, अक्कलकुआ, नंदुरबार येथील वाहनचालक गुजरातमधील पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत.

तर गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणारे अनेक वाहन चालक गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर टाकी फुल करतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागातील पंप चालकांचे पेट्रोल पंप शुकशुकाट दिसून येत आहे तर व्यवसाय चौपट झाला आहे.

चोवीस तासांमध्ये साधारणत हजारो लिटर डिझेलची विक्री होणाऱ्या पंपावर १००-२०० लिटरची विक्री होत आहे. गुजरात राज्यात पेट्रोल १४ रूपये स्वस्त आणि डिझेल ४ स्वस्त असल्याने २४ तासात ५ हजार पेट्रोलची विक्री होते. केंद्र व राज्य सरकारने दर कमी केल्याने पेट्रोल पंपावर महाराष्ट्र पेक्षा चार रुपयाने डिझेल स्वस्त मिळत आहे.