Petrol Price Today : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Disel) दरात सरकारी तेल कंपन्यांकडून (Government oil companies) कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तेल कंपन्यांनी नवे दर (Rate) जाहीर केले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोलचा दर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीपासून या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 10 रुपयांची वाढ केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही वाढ झाली नाही.

IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये, डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे.

त्याचवेळी डिझेल 99.83 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. आणखी एका महानगर चेन्नईबद्दल बोलायचे तर, इथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक लिटर पेट्रोल 110.85 रुपयांना तर एक लिटर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहर               पेट्रोल       डिझेल
दिल्ली             105.41    96.67
मुंबई              120.51    104.77
कोलकाता        115.12     99.83
चेन्नई             110.85      100.94

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.