‘या’ देशांमधील विमान प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालणंच, अपघातांची आकडेवारी थरकाप उडवणारी!

Published on -

अलीकडेच 12 जून 2025 रोजी भारतातील अहमदाबादमध्ये घडलेला AI171 विमान अपघात हा संपूर्ण देशासाठी हादरून टाकणारा क्षण होता. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 241 जण होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 33 सेकंदात हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले आणि एका भीषण दुर्घटनेत केवळ विश्वास नावाचा युवक वाचला. हा व्हिडीओ इतका भयावह होता की पाहणाऱ्यांची झोप उडाली.

अहमदाबाद अपघातानंतर केदारनाथमध्ये 7 जणांचा बळी गेलेला हेलिकॉप्टर अपघात, तसेच 2020 मधील केरळमधील विमान धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे होण्याचा प्रसंग, ही भारतातील काही महत्त्वाच्या अपघातांची उदाहरणे आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास, भारत विमान अपघातांच्या यादीत फार वर नाही.

सर्वाधिक अपघात झालेले टॉप 5 देश

एका प्रसिद्ध अहवालानुसार, 1945 ते 2022 दरम्यान सर्वाधिक विमान अपघात अमेरिकेत नोंदवले गेले आहेत, एकूण 864. या अपघातांच्या पाठीमागे तिथली प्रचंड हवाई वाहतूक, जुनी विमाने आणि काही वेळा मानवी चुकाही कारणीभूत ठरल्या. अमेरिकेने नियम कडक केले असले, तरी दरवर्षी 11-12 अपघातांची सरासरी काळजी वाढवणारी आहे.

रशिया

रशिया दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 539 अपघात झाले आहेत. येथील जुनी विमाने, कठीण हवामान, आणि विमानांच्या देखभालीतील त्रुटी हे मुख्य कारण ठरले. हवामानामुळे उड्डाणात अडथळे निर्माण होतात आणि दूरवर असलेली हवाई रूट्स अपघाताच्या शक्यता वाढवतात.

कॅनडा आणि ब्राझील

कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर असून,येथे 191 अपघातांची नोंद आहे. इथे थंडी आणि प्रचंड जंगलं यामुळे विमानांची सुरक्षित लँडिंग कठीण होते. ब्राझील चौथ्या स्थानावर असून, 190 अपघातांमुळे तोही अपघातप्रवण देश ठरतो. इकडे जंगलांमधून जाणाऱ्या मार्गांमुळे नेहमीच अडचणी येतात.

कोलंबिया

कोलंबिया पाचव्या क्रमांकावर असून येथे 184 अपघात झाले आहेत. पर्वतीय प्रदेश आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे कोलंबियात लहान विमान अपघात जास्त प्रमाणात घडले आहेत.

आशियातली परिस्थिती

आशियात सर्वाधिक अपघात इंडोनेशियात झाले असून, गेल्या 25 वर्षांत 2,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे 104 अपघातांची नोंद झाली आहे. बेटांमधील उड्डाणे, कमी देखभाल आणि खराब हवामान यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. भारत या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. 77 वर्षांत 95 अपघात घडले आहेत. आशियात भारत चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!