महागडं पॉलिश विसरा! घरातील लाकडी दरवाजाला ‘या’ 1 चमचा तेलाने येईल नव्यासारखी चमक, जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक

Published on -

आपल्या घरातले लाकडी दरवाजे कितीही मजबूत असले तरी, काही वर्षांनंतर त्यांची चमक निस्तेज होते, रंग फिका पडतो आणि सगळं दृश्य थोडं उदासवाणं वाटू लागतं. अशा वेळी, काहीजण महागड्या क्लिनर किंवा पॉलिश घेऊन येतात, तर काहीजण दरवाजेच बदलण्याचा विचार करतात. पण खरंतर गरज असते फक्त थोडीशी काळजी घेण्याची आणि एक छोटासा उपाय वापरण्याची, जो तुमच्या खिशालाही परवडेल आणि तुमच्या दरवाज्यालाही नवा लुक देतो.

मोहरी किंवा नारळाचं तेल

फक्त एक चमचा मोहरी किंवा नारळाचं तेल वापरून तुम्ही तुमचं लाकडी दार पुन्हा एकदा चमकदार करू शकता. यासाठी ना कोणतं महागडं उपकरण लागेल, ना कुठलं खास पॉलिश. स्वयंपाकघरात सहज सापडणाऱ्या तेलाने तुमच्या दरवाज्याचा चेहरामोहरा बदलेल.

या उपायासाठी सर्वप्रथम दरवाजा स्वच्छ करा. कोरड्या किंवा किंचित ओल्या कापडाने दरवाज्यावरील धूळ आणि चिकटपणा साफ करा. जेव्हा पृष्ठभाग स्वच्छ असेल, तेव्हाच तेल नीट शोषलं जातं आणि त्याचा खरा प्रभाव दिसून येतो.

नेमकं काय कराल?

यानंतर घ्या एक जुना पण मऊ सुती कपडा, जसं की जुना टी-शर्ट. त्यावर थोडं तेल टाकून, दरवाज्यावर हलक्याच हातांनी आणि गोलाकार हालचालींमध्ये चोळा. लाकडाच्या पोतामध्ये तेल खोलवर मुरेल, असं करताना घाई करू नका एकदम हळुवार ही प्रक्रिया करा.

तेल लावल्यानंतर 15-20 मिनिटे दरवाज्याला तसेच राहू द्या. ही वेळ तेलाला पृष्ठभागाच्या आत खोलवर मुरायला मदत करते. यानंतर, एक स्वच्छ कोरडा कापड घ्या आणि दरवाजा पुन्हा एकदा पुसा. उरलेलं तेल काढून टाका तुम्हाला लगेच बदल दिसून येईल. तुमचा जुना दरवाजा अगदी नव्यासारखा चमकदार दिसून येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!