गर्भधारणेदरम्यान शिवलिंग पूजन योग्य की अयोग्य? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं!

Published on -

आई होणं ही एक अत्यंत भावनिक आणि पवित्र प्रक्रिया आहे. या काळात अनेक स्त्रिया अध्यात्माच्या अधिक जवळ जातात, कारण त्यांना वाटतं की मनशांती आणि सकारात्मकतेमुळे बाळावर चांगला प्रभाव पडतो. अशा वेळी अनेक प्रश्न मनात येतात, विशेषतः देवपूजेबाबत. त्यातच शिवलिंग पूजेबाबत एक प्रश्न वारंवार विचारला जातो की, “गर्भवती महिला शिवलिंगाची पूजा करू शकतात का?”

शास्त्र काय सांगते?

आपल्या समाजात काही पारंपरिक समजुती आहेत की गरोदरपणात शिवलिंगाची पूजा करू नये. पण या विश्वासामागे कोणताही ठोस धार्मिक आधार नाही. खरे पाहता, धार्मिक ग्रंथांमध्ये कुठेही असे स्पष्टपणे सांगितलेलं नाही की गर्भवती महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये. उलट, भगवान शिव हे ‘भोलेनाथ’ म्हणून ओळखले जातात, जे आपल्या भक्तांची भक्ती स्वीकारतात, ती विधीमधली शिस्त पाहून नाही तर भावनेची शुद्धता पाहून.

भगवान शिव हे करुणेचे आणि क्षमाशीलतेचे प्रतिक आहेत. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने मनोबल वाढते, भीती दूर होते आणि अंतःकरणात शांततेचा अनुभव येतो. गर्भवती महिलांसाठी हीच शांतता आणि स्थैर्य अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या प्रत्येक भावना बाळावर थेट परिणाम करते. म्हणूनच, गरोदरपणात शिवाची पूजा केल्यास त्याचा लाभ मातेलाही होतो आणि बाळालाही.

शिवपूजनसाठी नियम आहेत का?

हे लक्षात ठेवायला हवं की, अध्यात्म ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाही, तर एक मानसिक, भावनिक आधारसुद्धा आहे. विशेषतः जेव्हा मनात गोंधळ असतो तेव्हा शिवपूजेने एका गूढ शांततेचा अनुभव मिळतो. त्यामुळे जर कोणी मनापासून, भक्तीने, प्रेमाने शिवाची पूजा करत असेल तर कोणताही नियम, मनाई किंवा भीती त्याच्या आड येऊ नये.

अशा पवित्र काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहणं, स्वतःमध्ये स्थिरता राखणं आणि आपल्या बाळासाठी एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण करणं ही सगळ्यात मोठी पूजाच होय. त्यामुळे, शिवलिंग पूजेबाबत कोणतेही संकोच किंवा संभ्रम मनात ठेवू नये. भावनेच्या पवित्रतेसह केलेली पूजा ही केवळ ईश्वराला प्रिय नसते, तर तुमच्या बाळासाठीही एक आशिर्वाद ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!