केस गळतीसाठी जावेद हबीब यांनी सांगितला चमत्कारी उपाय; आठवड्याभरात परिणाम दिसेल असा फॉर्म्युला नक्की वापरुन पाहा!

Published on -

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढते प्रदूषण, असंतुलित आहार, हार्मोन्समध्ये बिघाड आणि सतत बदलणारे उत्पादन यामुळे तरुण वयातच केस विरळ होऊ लागतात. या समस्यावर आता प्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी केसांच्या वाढीसाठी एक असा उपाय सांगितला आहे जो तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो, तो म्हणजे कांद्याचा रस.

खरं पाहिलं तर केस गळतीमुळे त्रस्त झालेल्या अनेक व्यक्तीनी हजारो रुपये खर्च करून विविध उपाय केलेले असतात. परंतु बहुतेक उपायांमध्ये तात्पुरता फरक पडतो आणि समस्या पुन्हा उफाळून येते. पण जर नैसर्गिक, स्वस्त आणि परिणामकारक उपाय असेल, जो घरबसल्या करता येईल तर तो नक्कीच आकर्षक वाटतो. जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार, हा एकच उपाय 99% लोकांना फायदा देतो आणि तो म्हणजे कांद्याचा रस.

कांद्याचा रस

कांदा आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जातो, पण त्यात दडलेली औषधी शक्ती फार थोड्यांना माहित असते. कांद्यात असणाऱ्या सल्फरयुक्त घटकांमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि टाळूतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते आणि गळती थांबते.

कांद्याचा रस तयार करून तुम्ही तो टाळूवर लावू शकता. लावण्याआधी तुमचे केस विभागा आणि कापसाने रस टाळूपर्यंत पोहोचवा. नंतर साधारण 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मालिश करा आणि 30 मिनिटं तसंच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पूने धुवून टाका. चांगला परिणाम हवा असल्यास, कांद्याच्या रसात थोडं मध किंवा नारळाचं तेल मिसळून लावल्यास फायदा होतो.

महत्वाचा सल्ला

हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करणे उत्तम मानले जाते. पण सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही ऍलर्जी होणार नाही याची खात्री करण्यासाठी आधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. टाळूवर लावल्यावर खाज, लालसरपणा किंवा चिडचिड जाणवली तर हा उपाय टाळावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!