भारतीय परंपरेत तुळशीला मोठे महत्व आहे. भारतीय घरात तुळशी ही श्रद्धेचं, नात्याचं आणि अध्यात्मिकतेचं एक खास केंद्र असतं. आपल्या संस्कृतीत, तुळशीला “माता लक्ष्मीचं रूप” मानलं जातं आणि तिची पूजा हे घरात समृद्धी आणि शांती नांदण्याचं एक महत्त्वाचं साधन समजलं जातं. रोज संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावल्याने घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते.

दिवा लावण्याचे फायदे
वास्तुशास्त्र सांगतं की तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याने घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. दिव्याचं मंद तेज आणि त्यातून निघणारी उष्णता, घरात साचलेल्या नकारात्मकतेचा नायनाट करते. रोज दिवा लावल्याने घरात दिवसभर साचलेला थकवा आणि अशांतता दूर होते.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी तुळशीच्या झाडात वास करतात. त्यामुळे, जेव्हा आपण तुळशीसमोर दिवा लावतो, तेव्हा तो केवळ एक रोप नसून, त्या दैवी शक्तींना नम्रतेने आमंत्रण देतो. विशेषत: शनिवारी दिवा लावल्यास शनिदेव प्रसन्न होतात असं मानलं जातं आणि त्यांची रागावलेली वक्रदृष्टी शांत होते. राहू आणि केतूसारख्या छायाग्रहेच्या त्रासामुळे जीवनात येणारे मानसिक आणि भावनिक गुंते, तुळशीजवळ लावलेल्या दिव्यामुळे हळूहळू सुटायला लागतात, अशी श्रद्धा आहे.
‘हा’ मंत्र जप करा
घरात आर्थिक अडचणी, तणाव, नातेसंबंधांमध्ये कुरबुरी किंवा कामात अडथळे जाणवत असतील, तर तुळशीसमोर दिवा लावणं आणि त्यावेळी “ॐ तुलस्यै नमः” किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय” असा मंत्र जप करणं हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे मनाला आधार मिळतो, विचारांमध्ये स्थिरता येते आणि मन शांत होतं. हा केवळ एक धार्मिक उपाय नाही, तर तणावमुक्त जीवनाकडे नेणारा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे.
या दिव्याची महत्ता एवढी आहे की, नियमितपणे लावल्यास ते वास्तुदोषही दूर करतं. काही वेळा, घरात नकारात्मकतेचं कारण ठरलेल्या गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत. अशा वेळी दिवा लावणं ही एक कृती, घरात शुभतेचं आणि स्थिरतेचं वातावरण निर्माण करते. घरात येणारी सुखद ऊर्जा केवळ आर्थिक बाबतीत मदत करत नाही, तर संपूर्ण कुटुंबामध्ये आपुलकी आणि समाधान वाढवते.