B. Pharma नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या टॉप मेडिकल करिअर ऑप्शन्स!

Published on -

नोकरीच्या शोधात असलेल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरू शकते. B.Pharm पूर्ण केल्यानंतर अनेकांना वाटतं की आता पुढं काय? पण खरं पाहिलं तर ही फक्त सुरुवात असते. औषधनिर्मितीच्या या चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर तुमच्यासमोर अशा अनेक वाटा खुल्या होतात ज्या केवळ स्थिर नोकरीच नव्हे, तर भरघोस कमाईची संधीही देतात. औषध विक्रीपासून ते संशोधनापर्यंत आणि सरकारी पदांपासून ते मल्टिनॅशनल कंपन्यांमधील उच्च पदांपर्यंत, B.Pharm झाल्यानंतरच्या संधींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.

 

फार्मासिस्ट

 

भारतासारख्या देशात, जिथं 10,500 हून अधिक फार्मा युनिट्स आणि 3,000 कंपन्या आहेत, तिथं B.Pharm झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संधींची कमतरता नाही. आज फार्मासिस्ट हे एक स्थिर आणि आदराचं करिअर मानलं जातं. सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या फार्मासिस्टना दरमहा 45,000 ते 56,000 रुपये मिळतात, तर खाजगी क्षेत्रातही अनुभवाच्या आधारावर वर्षाला 5 ते 7 लाख रुपये सहज मिळू शकतात. रुग्णांना योग्य औषध, डोस आणि त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असते.

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह

 

ज्यांना माणसांमध्ये मिसळायला आवडतं, चांगली संवादशैली आहे, आणि मार्केटिंगमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही योग्य निवड आहे. या नोकरीत सुरुवातीला वर्षाला 3.5 ते 5 लाख रुपये पगार मिळतो, पण उत्तम कामगिरी केल्यास तो 10 ते 15 लाखांपर्यंत सहज पोहोचतो. प्रवास आणि प्रमोशनच्या संधींमुळे हे क्षेत्र अधिक आकर्षक मानलं जातं.

औषध निरीक्षक

 

सरकारी नोकरीत रस असणाऱ्यांसाठी औषध निरीक्षक ही एक उत्तम संधी आहे. UPSC किंवा राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांमधून निवड झाल्यास दरवर्षी 6 ते 10 लाखांचा पगार मिळतो. यामध्ये काम करताना औषधांची गुणवत्ता तपासावी लागते, जी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते.

क्लिनिकल रिसर्च असोसिएट

 

संशोधनात रस असणाऱ्यांसाठी क्लिनिकल रिसर्च असोसिएट किंवा R&D क्षेत्र हे सर्वोत्तम पर्याय आहेत. येथे सुरुवातीला 4 ते 8 लाखांचा पगार मिळतो, पण अनुभव वाढत गेला की तो 15 ते 25 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हे क्षेत्र विज्ञान, डेटा विश्लेषण आणि प्रयोगशाळेतील कामासाठी ओळखलं जातं.

फार्माकोव्हिजिलेन्स मॅनेजर

 

याशिवाय, फार्माकोव्हिजिलेन्स मॅनेजर म्हणूनही काम करता येतं, जेथे औषधांचे दुष्परिणाम नोंदवणं, त्यांचे निरीक्षण करणं आणि त्यावर उपाय शोधणं हे मुख्य काम असतं. या पदावर 3 ते 5 वर्षांच्या अनुभवानंतर वर्षाला 15 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. हे काम मुख्यतः मोठ्या फार्मा कंपन्यांमध्ये असतं आणि आज या क्षेत्राला खूप मागणी आहे. अशा अनेक जबाबदाऱ्या आणि करिअरच्या वाटा B.Pharm नंतर तुमच्यासमोर उभ्या राहतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!