जेवणात कांदा-लसूण खाणं का टाळावं?, प्रेमानंद महाराजांनी सांगितलं खरं कारण!

Published on -

जेवण म्हणजे केवळ भूक भागवण्याचा एक क्रियाकलाप नाही, तर तो एक पवित्र संस्कार आहे, असे संत प्रेमानंद जी महाराज सांगतात. त्यांच्या मते, अन्न हे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींच्या पोषणासाठी असते. त्यामुळे अन्न सेवन करताना काही खास नियम पाळले तर ते एक आध्यात्मिक अनुभव ठरू शकतो. प्रेमानंदजींच्या या शिकवणीमध्ये, जेवण ही केवळ चव किंवा आहाराची बाब नसून, ती भक्ती आणि साधनेची वाटचालही आहे.

महाराजजी म्हणतात की अन्न जेवणापूर्वी देवाला अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे. देवाचे स्मरण करत केलेले अन्न सेवन म्हणजेच प्रसाद. असे अन्न नुसते शरीर पोसत नाही, तर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. जेवण सुरू करण्यापूर्वी हात धुणे, स्वच्छ जागी बसणे आणि शांतपणे आभार मानणे या साध्या पण प्रभावी गोष्टी आत्मिक शुद्धतेकडे घेऊन जातात.

कांदा-लसूण का टाळावा?

त्यांच्या मते, अन्न नेहमी आपली भूक पूर्ण होण्याच्या थोडे आधी थांबावे. म्हणजेच पोट पूर्ण भरू नये. एक भाग अन्नासाठी, दुसरा पाण्यासाठी आणि तिसरा भाग हवेसाठी असावा. या तत्त्वाचे पालन केल्यास पचन नीट होते, शरीरावर ताण येत नाही आणि मनही प्रसन्न राहते. जास्त खाणे ही केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक अस्वस्थतेचेही कारण बनते.

प्रेमानंद जी महाराज सात्विकतेवर भर देतात. त्यांच्यामते, कांदा, लसूण, तळलेले किंवा मसालेदार अन्न तामसिक वृत्ती वाढवते. त्यामुळे शक्यतो शुद्ध, हलके आणि पचायला सोपे अन्न खावे. खीर, डाळ, भाजी आणि पुरी यांसारखे पारंपरिक सात्विक पदार्थ मनाला शांतता देतात आणि शरीराला ताकद.

संध्याकाळी 6 नंतर जेवण टाळा

त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीचे जेवण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेणेच उत्तम. उशिरा खाल्लेले अन्न शरीरात नीट पचत नाही, झोपेवर परिणाम होतो आणि शरीर जड वाटू लागते. जेवताना शांतता राखणे, मोबाईल, टीव्ही किंवा वादविवाद टाळणे यामुळे अन्नाचे पचन सुकर होते. यासोबतच, जेवताना उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसल्यास त्या दिशांमधील सकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकते, असेही ते सांगतात.

संत प्रेमानंदजी महाराजांचे मत आहे की अन्न हे शरीराचा भाग बनते, म्हणून त्याचा परिणाम केवळ पचनावरच नाही, तर संपूर्ण जीवनशैलीवर होतो. शांत वातावरणात, कृतज्ञतेने आणि भक्तीभावाने अन्न घेणे हेच खरे आरोग्याचे आणि अध्यात्माचे दार उघडणारे साधन आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!