PM Kisan : तुम्ही PM किसान योजनेच्या 12व्या हफ्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कॅबिनेट बैठकीत (cabinet meeting) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

या झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर केंद्र सरकार (Central Govt) लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात बाराव्या हप्त्याची रक्कम जमा करू शकेल, अशी अपेक्षा आहे.

या तारखेला खात्यात पैसे येऊ शकतात

PM मोदी लवकरच PM किसान योजनेचा 12वा हप्ता जारी करणार आहेत (PM Kisan 12th Installment Released). कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान मोदी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन 2022 दरम्यान याची घोषणा करतील.

याप्रमाणे तुमची हप्त्याची स्थिती तपासा

1. हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
2. आता Farmers Corner वर क्लिक करा.
3. आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

ई-केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत

ई-केवायसी न करणाऱ्यांना या वेळी १२व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने (Govt) आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही तुमचे ई-केवायसी अद्याप पूर्ण केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा.

तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता

याशिवाय, अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक १५५२६१ वर कॉल करू शकता. येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याबद्दल माहिती मिळेल.