file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- रूईछत्तीशी एसटी बस स्थानकाजवळ नगर तालुका पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या तरुणाला अटक केली.

राजू कुंडलीक खकाळ (रा. रूईछत्तीशी ता. नगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ

एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती.

त्यांनी तातडीने पोलीस पथकाला घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी खकाळ याला रूईछत्तीशी बस स्थानकावरून ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली.

त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत कट्टा, काडतुसे जप्त केली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून खकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.