अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर येथे दारूबंदी असतानाही राजरोस अवैध्य दारू विक्री होत असून राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी अवैध्य व्यवसायिकांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजूर येथील संजय शुक्ला व रामदास कानकाटे यांनी अवैधरित्या दारू विक्री करीता घरात साठा करून ठेवल्याबाबत राजूर पोलिसांना माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांचे पथकाने संजय शुक्ला याच्या घरी छापा मारून त्याच्या घरातून १७०४० रू. किमतीच्या २८४ देशी दारूच्या बाटल्या व ४१६० रू. किमतीच्या मॅकडोनाल्ड व्हिस्की बाटल्या एकूण २१२०० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानुसार राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच रामदास कानकाटे याच्या घरी छापा मारून त्याच्या घरातून १७२२० रू किमतीच्या २८८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्याच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.