अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात अवैध धंदे वाढू लागले आहे. यामुळे याला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. अशाच एका पोलिसांच्या कारवाईमध्ये लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime)

संजय सुभाष जगताप (रा. वाणेवाडी ता. पाटोदा जि. बीड) अशी गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, धोत्रे गावच्या शिवारात रामकिसन अडाले याने त्याच्या दोन मित्रांसमवेत राहत्या घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस पथकाने अडाले याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना हिरा पानमसाला गुटखा व तंबाखू असा दोन लाख 76 हजार रूपयांचा माल मिळाला. पोलिसांनी सर्व गुटखा जप्त करत आरोपीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.