आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी वाढणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण बंडखोरी करणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणूक बंडखोरीचे प्रमाण वाढेल आणि यामुळे उमेदवारांची संख्या देखील वाढणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने देखील तसेच संकेत दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली.

गत लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणूकित महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दन कोणाच्या बाजूने कौल देते हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणूक बंडखोरीचे प्रमाण वाढेल आणि यामुळे उमेदवारांची संख्या देखील वाढणार आहे.

हेच कारण आहे ती महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे तसेच महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदे गट या पक्षांमध्ये कोण बंडखोरी करणार आणि कोण माघार घेणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही यंदा मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघा अंतर्गत 12 विधानसभा मतदारसंघ येतात. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या 12 विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघ एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकले होते. तसेच तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेत आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या.

अपक्षने देखील एक जागा जिंकली. 2019 च्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे, संगमनेर मधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिर्डी मधून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे, श्रीरामपूर मधून काँग्रेसचे लहू कानडे, नेवासा मधून अपक्ष शंकरराव गडाख, शेवगाव पाथर्डी मधून भाजपाच्या मोनिका राजळे, राहुरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्ता तनपुरे, पारनेर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके, अहमदनगर शहर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, श्रीगोंदा मधून भाजपाचे बबन पाचपुते, कर्जत जामखेड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे विजयी झालेत.

पण, शिवसेना अन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण बदलले. सध्या शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार गट आणि भाजपा हे महायुतीमध्ये एकत्रित आहेत. तसेच ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी मध्ये एकत्र आहे.

हे दोन्ही गट आता निवडणुकीत एकत्रितपणे लढणार आहेत. मात्र यामुळे इच्छुक उमेदवारांची पंचायत झाली आहे. एकाच जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे तिन्ही पक्षातून अनेकजण आणि महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत. अशी परिस्थिती जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.

हेच कारण आहे की यंदा बंडखोरी वाढून उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकसंध होती. यंदा मात्र हे दोन्ही पक्ष फुटले असल्याने दोन गट तयार झाले आहेत आणि यामुळे उमेदवारांची संख्या देखील वाढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe