अहमदनगर ब्रेकिंग : माजी जिल्हा परिषद सदस्याचे अपघातात निधन !

Ahmednagar Breaking :- नगर जिल्ह्यातून आताच्या क्षणाला एक वाईट बातमी आली आहे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सदाफुले यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

ते दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली, यात सदाफुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरकडे घेवून येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्याकडे माहिती प्राप्त झाली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सदाफुले हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. ते चिचोंडी पाटील (ता. नगर) गावचे रहिवासी होते. त्यांच्या जाण्याने चिचोंडी गावासह नगर तालुक्यावर शोककळा पसरली आहे

🔥🔥🔥 अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी 9665762303 हा नंबर तुमच्या Whatsapp गृपवर ॲड करा 📲