बारामतीत महायुतीकडून कोणते पवार उभे राहणार ? जय पवार की अजित पवार ? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात संपवला विषय

यंदाच्या निवडणुकीत बारामती मधून अजित पवार उभे राहणार की जय पवार यांना संधी मिळणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यामुळे या विधानसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. अजित दादा यावेळी काही नवीन डाव टाकणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

Tejas B Shelar
Published:
Baramati Politics

Baramati Politics : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय राहिला होता. लोकसभेच्या निवडणुकीत येथे नणंद भावजाय अर्थात सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला अन सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

दरम्यान, आता विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण की, यावेळी या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून या मतदार संघात युगेंद्र पवार हे उमेदवारी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू देखील केली आहे. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ गेल्या काही महिन्यात पिंजून काढला आहे. अगदीच लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभेची तयारी करत आहेत. यामुळे यावेळी युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे बारामतीचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मध्यंतरी बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत वेगवेगळे विधान केलेत. त्यांनी बारामती मधून यावेळी त्यांचे सुपुत्र जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असे संकेत दिले होते. स्वतः अजित पवार यांनीच बारामती मधून जय पवार यांची लॉन्चिंग करणार असे सुतोवाच केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

यंदाच्या निवडणुकीत बारामती मधून अजित पवार उभे राहणार की जय पवार यांना संधी मिळणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यामुळे या विधानसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. अजित दादा यावेळी काही नवीन डाव टाकणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

मात्र आता या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाकडून पूर्णविराम लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत जय पवार उभे राहणार की अजित दादा पुन्हा एकदा येथून उमेदवारी करणार यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, “लोकसभा निवडणुकीवेळी ज्या प्रमाणात आमची मते भाजपाला पडायला हवी होती, ती पडली नाहीत; हे खरं आहे. परंतु, आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला तसे होणार नाही. यावेळी वेगळा निकाल दिसेल”, असं म्हणतं महायुतीचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच, अजित पवार बारामतीतून लढणार की नाही, या गोंधळाबद्दलही त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तटकरे यांनी, अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत असे स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe