Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोशारी यांची लवकरच उचलबांगडी, नारायण राणेही राज्यपाल होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातून देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा विरोध आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवले होते.

यामुळे काही कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नवीन नावाची चाचपणी सुरू आहे. यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची चर्चा आहे.

राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी अनेकवेळा मोदी सरकारकडे केली आहे. आता कोश्यारी यांना हटवून त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले. यामुळे चर्चा सुरू आहे.

मला महाराष्ट्राचे राज्यपाल व्हायला आवडेल, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या होत्या. यामुळे सर्वांना उत्सुकता लागली आहे. लवकरच हे नाव समोर येईल.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील राज्यपाल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात सोडून इतर कोणत्याही राज्यात त्यांची नियुक्ती होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.