Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी माघार घेतली आहे.

ते म्हणाले, जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी चित्रफीत दाखविली जात आहे त्यात अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे, असे म्हणत त्यांनी सावरासावर केली आहे.

शिवसेना आणि भाजप मिळून २८८ जागा लढणार आहे. त्यात सर्व घटक पक्षांचा समावेश राहणार आहे. भाजप जेवढी तयारी करेल तेवढी ती शिवसेनेच्या कामात येईल आणि शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपच्या कामी येणार आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही आमदार व पदाधिकारी लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असेही बावनकुळे म्हणाले. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीत २४० पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याने तयारीला लागा, असे म्हटले होते.

शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील कारण त्यांच्याकडे तितकेच आमदार आहेत, असे म्हटले होते. यामुळे याची बरीच चर्चा झाली. बावनकुळे यांनी याबाबत वक्तव्य केले होते. यावर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज होते.

दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्यात काहीही दम नाही. मुळात त्यांना एवढे अधिकार कोणी दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. राज्यात शिवसेना-भाजपची युती आणि सरकार आहे, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.