ठाकरेंचा एवढा पुळका येत असेल तर मातेश्रीवर जाऊन भांडी घासा; निलेश राणे केसरकरांवर आक्रमक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असे दीपक केसरकर म्हणाले होते. केरसकरांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी केसकरांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.

राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरु नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका. नाही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत तुम्ह सांगाल त्या भाषेत उत्तर द्यायची तयारी आहे आमची. वातावरण खराब करुन नका, असे निलेश राणे केसरकरांनी म्हणाले आहेत.

जबाबदारी आपल्या दोघांवर आहे हे विसरु नका. आपण एका युतीत आहोत. नविन नविन माध्यमांसमोर बोलयला आता तुम्ही लागला आहात. तुम्हाला सगळं काय आलेलं नाही. ते शिकून घ्या. कोणाला काय बोलायचं कुठे बोलायचं हे आधी विचारुन घ्या आणि मगच तोंड उघडा. तुम्हाला उद्धव ठाकरेंचा एवढा पुळका येत असेल तर मातेश्रीवर जाऊन भांडी घासा, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांच्याशी विकासाच्या मुद्दय़ावर एकमत करायला मी कधीही तयार आहे. मात्र नारायण राणे, त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलण्याचे टाळले पाहिजे. राणे यांच्याकडे रोजगार निर्माण करणारे मंत्रालय आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले होते.