Nitin Bangude : ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुवर्णकाळ येणारच! नितीन बानगुडे पाटलांचे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nitin Bangude : केळगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, जनमाणसाचा कानोसा घेतला तर तुम्हाला लोकमाणसांची मते कळतील, उद्याचे भविष्य हे शिवसेनेचेच असेल तेंव्हा भविष्यात शिवसेनेचा सुवर्णकाळ आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवसेना येत्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार आहे. जनमाणसात आता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहाभुतीची लाट निर्माण होणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली असून सरकारला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

तसेच ते म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतांनाही सरकारने अद्याप कोणतेही मदतीसाठी पाऊल उचलले नाही. अर्थसंकल्पात तर शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.

उत्पादन खर्च व बाजार भावामध्ये फार मोठी तफावत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी उपाशीच आहे. त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याचा आरोप करून कांद्याला भाव नाही, कपाशीला भाव नाही, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.