आ. संग्राम जगताप यांची राजकीय ताकद वाढली ! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत किंग्ज गेट रोड येथील युवकांचा राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार जगताप व महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे.

Tejas B Shelar
Published:
Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडत आहे. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, याच विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार जगताप व महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे.

त्यांच्या धर्मपत्नी शितल जगताप यादेखील प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रिय आहेत. शितल जगताप यांच्याकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत आणि त्यांच्या सभांना मतदार संघातील महिला वर्गांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवला जातोय. प्रचारात सध्या स्थितीला संग्राम जगताप यांची आघाडी पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मतदार संघातील युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आमदार जगताप यांची राजकीय ताकद वाढली असून या युवकांच्या पाठिंब्याचा आणि पक्षप्रवेशाचा या निवडणुकीत जगताप यांना फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांनी मोठ्या संख्येने संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच या युवकांच्या माध्यमातून एकजुटीने आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा दाखवण्यात आला असून युवकांनी आमदार जगताप हे पुन्हा एकदा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

या युवकांच्या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, मुजाहिद बेग, शैबाज शेख, दीपक वाघ, इमरान बागवान, तन्वीर खान, गौरव हरबा, मोहसिन शेख, फिरोज खान, परवेज शेख, साहिल शेख, शुभम गायकवाड, ऋषीकेश जगताप, कुणाल ससाणे, ओमकार मिसाळ, मंगेश शिंदे, स्वप्निल कांबळे, आशुतोष पानमळकर, राहुल थोरात, समीर खान, मोहसीन शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आ. अरुणकाका जगताप व आ. संग्राम जगताप हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी या युवकांचे माजी आमदार अरुण काका जगताप व विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी स्वागत केले. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी जुनेद खान यांनी या तरुणांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केलाय.

यावेळी अरुण काका जगताप यांनी मतदार संघातील तरुणांचा आणि नागरिकांचा संग्राम भैया जगताप यांना मिळणारा पाठिंबा हिच त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे म्हणत पक्षात सामील झालेल्या युवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी आ. जगताप म्हणालेत की, यंदाची विधानसभा निवडणुक युवकांनी आपल्या हातात घेतलीये, विकासाचा अजेंड्याला त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. शहर विकासासाठी राजकारण न करता, फक्त विकास साधण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe