Sanjay Shirsat : भाजपने 240 जागा लढवण्याची घोषणा करताच शिंदेंचा आमदार संतापला, म्हणाले, आम्ही मूर्ख…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Shirsat : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही.

शिंदे गटाला ४८ जागा देवू, आम्ही मुर्ख आहोत का? मुळात बावनकुळे यांना जागा वाटपाचे अधिकार कुणी दिलेत? असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटात सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत भाजपने तयारी सुरू केली आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीत २४० पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याने तयारीला लागा, शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील कारण त्यांच्याकडे तितकेच आमदार आहेत, असे म्हटले होते. यामुळे याची बरीच चर्चा झाली. बावनकुळे यांनी याबाबत वक्तव्य केले होते.

बावनकुळे यांच्या वक्तव्यात काहीही दम नाही. मुळात त्यांना एवढे अधिकार कोणी दिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. राज्यात शिवसेना-भाजपची युती आणि सरकार आहे, असेही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

तसेच बावनकुळे हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या अशा विधानामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होवू शकतो याची जाणीव त्यांना असयाला हवी, असेही ते म्हणाले. यामुळे आता येणाऱ्या काळात कोण किती जागा लढवणार हे लवकरच समजेल.