करंजी (ता. पाथर्डी) येथील नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध खेळांचे मैदानी व इंटरटिव्ह पॅनल युक्त वर्गाचे उद्घाटन खासदार डॉ. विखे पाटील व जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उदघाटनानंतर त्यांनी बेंचवर बसून त्यांनी शिक्षकांचे अध्यापन ऐकले.
विशेष म्हणजे बसविलेल्या इंटरेटिव्ह पॅनलच्या सुविधेने विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यम मधून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणासाठीच गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाल्याचे खा. विखे म्हणाले.
आपले सरकार हे विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध तर आहेच शिवाय शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात जितक्या अनुदानित शाळा आहेत, अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे.