तेव्हा पंतप्रधान मोदी तुमचे वडील होते का? सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना सवाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीचा एक भाग आज प्रदर्शित झाला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत.

बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा एकदा सुनावले. त्यावर 2019 ला निवडणुकीवेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पोस्टरवर लावून मते मागितली तेव्हा ते तुमचे वडील होते का?, असा सवाल मुनगंटीवरांनी विचारला आहे.

तुम्ही म्हणता सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा. तर मग तेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधी पक्ष भूमिका पार पाडा, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.