रिअल इस्टेट

घर खरेदीमध्ये लाखोंचा फायदा मिळवायचा असेल तर मुलगी,पत्नी, बहिण किंवा आईच्या नावाने करा खरेदी! कराल लाखोंची बचत

Published by
Ajay Patil

Home Buying Tips:- महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आघाडीवर महिलांचे सक्षमीकरण व्हावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून महिलांचा समाजातील सहभाग वाढावा तसेच आर्थिक व राजकीय दृष्टिकोनातून त्या स्वावलंबी व्हाव्या याकरिता अनेक महत्त्वपूर्ण पावले केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून उचलण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून महिलांना अनेक गोष्टींवर विशेष प्रकारची सूट दिली जाते व महिला या आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हाव्यात याकरिता त्यांना प्रॉपर्टीमध्ये देखील करात सूट व इतर आर्थिक सवलती देण्यात आले आहेत.

महिलांच्या नावाने जर मालमत्ता खरेदी केली तर त्यांना टॅक्समध्ये सूट मिळतेच परंतु इतर महत्त्वाच्या आर्थिक गोष्टींमध्ये देखील मोठी सूट दिली जाते.

त्यामुळे घर किंवा फ्लॅट इत्यादी मालमत्ता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती तुम्ही घरातील  आई किंवा बहीण तसेच पत्नी किंवा मुलीच्या नावाने खरेदी केली तर तुम्ही मालमत्ता खरेदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण माहिती घेणार आहोत की जर महिलांच्या नावाने घराची खरेदी केली तर कोणते फायदे मिळतात?

 महिलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी केली तर काय फायदे मिळतात?

1- होम लोनवर मिळते सवलत आता घर खरेदी करण्यासाठी बरेच व्यक्ती हे होम लोनचा आधार घेतात. होम लोन हे विविध बँकांच्या माध्यमातून किंवा गृहनिर्माण वित्त संस्थांच्या माध्यमातून दिले जाते.

परंतु जर महिलांच्या नावाने  घराची खरेदी असेल तर काही गृहनिर्माण फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून महिलांना व्याजदर कमी प्रमाणामध्ये आकारला जातो.

एवढेच नाही तर महिलांसाठी काही उद्दिष्ट आणि उत्पन्नानुसार विशेष कर्ज योजना देखील बनवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर होम लोन घेऊन घर घ्यायचे असेल तर तुम्ही पत्नीच्या नावे घर घेणे फायदेशीर ठरते.

2- मुद्रांक शुल्कामध्ये सूट देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली जाते.

काही राज्यांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी नोंदणी शुल्काचा दर पुरुषांसाठी असलेल्या दरापेक्षा दोन ते तीन टक्क्यांनी कमी आहे. महिलेच्या नावाने मालमत्ता नोंदणीकृत झाल्यास संबंधित महिलेला मुद्रांक शुल्कात मोठी सूट मिळते.

3- प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट मालमत्तेशी संबंधित आयकराचे जे नियम आहेत त्यामध्ये देखील महिलांना सूट देण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून देखील महिलांना प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेक प्रकारे सूट दिली जाते. परंतु त्याकरिता महिलेच्या नावावर प्रॉपर्टी असणे गरजेचे आहे व तरच महिलांना कर लाभ मिळू शकतो.

4- महिलेच्या आर्थिक सुरक्षा आणि स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रॉपर्टीची मालकी जर एखाद्या महिलेला दिली तर संबंधित महिलेची आर्थिक सुरक्षा याबाबतीत निश्चित होते व महिला स्वावलंबी बनते.

एखादी प्रॉपर्टी जर महिलेच्या नावाने असली तर ती त्याबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. प्रॉपर्टीची मालकी महिलेकडे असेल तर ती मालमत्तेची खरेदी विक्री किंवा ती मालमत्ता भाड्याने देणे इत्यादी बद्दलचा निर्णय तिच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकते. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर आर्थिक स्वावलंबन या माध्यमातून महिलेला प्राप्त होते.

Ajay Patil