Redmi Smartphones : Redmi त्याच्या नवीन फ्लॅगशिप सीरीज Redmi K60 वर काम करत आहे. सध्या चीनी कंपनीने आगामी Redmi K60 सीरीजच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती शेअर केलेली नाही. पण Redmi K60 चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत.

एका चीनी टिपस्टरने Redmi K60 चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक केले आहेत. टिपस्टरनुसार, Xiaomi च्या सब-ब्रँडद्वारे या मालिकेतील दोन स्मार्टफोनवर काम केले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट असू शकतो. Redmi K60 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असल्याच्याही बातम्या आहेत.

Redmi K60 मालिका स्पेप्सिफिकेशन्स

Tipster Digital Chat Station ने Weibo वर दावा केला आहे की Redmi K60 सीरीजच्या दोन फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट दिला जाईल. टिपस्टरनुसार, नियमित Redmi K60 मध्ये होल पंच कटआउटसह फ्लॅट डिस्प्ले, 5500mAh बॅटरी आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 48-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये असतील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की Xiaomi ने अद्याप Redmi K60 सीरीजबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या माहितीवर पूर्णपणे विसंबून राहू नका.

Redmi K60 मालिकेची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. या लोकप्रिय स्मार्टफोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह डिस्प्ले असू शकतो आणि 100W चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

Redmi K60 मालिका कंपनीच्या Redmi K50 मालिकेचे अपग्रेड असेल. Redmi K50 Pro आणि Redmi K50 स्मार्टफोन चीनमध्ये मार्चमध्ये लॉन्च करण्यात आले होते. Redmi K50 Pro मध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर तर Redmi K50 मध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर देण्यात आला आहे.