अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आकारण्यात येणारा ४०० कोटी रुपयांचा दंड थकला आहे. तो दंड पोलिस आता घरोघरी जाऊन वसूल करणार आहेत. ही मोहीम सोमवारपासून सुरू होणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेले वाहन मालकांचे तपशील अपुरे असल्याने ई चलन जारी झाले तरी त्याची बजावणी होत नाही. त्यामुळे ई चलनांचा धाक अद्याप निर्माण होऊ शकलेला नाही.

परिणामी दंड भरण्याकडे वाहन मालक दुर्लक्ष करतात किंवा ई चलन प्राप्त झाले तरी ते गांभीर्याने घेत नाहीत. या मानसिकतेमुळे वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या दंडापैकी २९ टक्के च रक्कम वसूल झाली असून सुमारे ४०० कोटींचा दंड अद्याप वसूल व्हायचा आहे.

वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या उपक्रमासाठी ५० पथके तयार झाली आहेत. प्रत्येक पथकात दोन शिपाई असून ते दहा हजार रुपये कि वा त्याहून अधिक रुपयांचा दंड थकवणाऱ्या वाहन मालकांचे दार ठोठावतील.

वाहन मालकांशी काय-कसे बोलावे, करोना काळात घ्यायची काळजी याबाबत या पथकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दंड वसुलीचा विषय काढताच वाद घालणाऱ्या, अंगावर धावून येणाऱ्या वाहन मालकांसोबत संवाद न साधता त्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना

या पथकांना देण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यापूर्वी वाहतूक पोलिसांनी दंड वसुलीचा वेग वाढवण्यासाठी विविध उपक्र म हाती घेतले. अलीकडेच वाहतूक पोलिसांनी एक कॉल सेंटर सुरू केले. दंड थकवणाऱ्यांना या कॉल सेंटरमधील अधिकारी, अंमलदार दूरध्वनीद्वारे संपर्क साधतात.

त्यांना शिल्लक रक्कम किती, ती कशी भरावी, न भरल्यास काय परिणाम होतील याची माहिती देतात. गेल्या तीन महिन्यांत या कॉल सेंटरने १४ कोटींचा दंड वसूल क ला आहे. त्यामुळे आता दंड वसुलीसाठी घरोघरी भेटी देण्याचा उपाय पोलिसांनी शोधला आहे.