अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  महाडमध्ये काही दिवसांपूर्वी तळीये गावात दरड कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी 2.15 मिनिटांनी भेट दिली. त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. गावकऱ्यांचा सांत्वन केलं. तसेच त्यांनी गावकऱ्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला.

अतिवृष्टीनं तळीये गावात होत्याचं नव्हतं करून टाकलं. गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तळीये गावावरच दरड कोसळली. या ३५ पैकी ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याने गिळंकृत केली.

अचानक ओढवलेल्या या संकटाने तळीये गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सध्या तळीये गावात मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तळीये गावाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुःखाने कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. राज्यात परिस्थिती उद्भवत असून,

जल आराखडा तयार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. तळीये गावात अद्याप बचावकार्य सुरूच आहे. ४० पेक्षा अधिक माणसांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत.

त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावाला भेट दिली. मुंबईहून दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री तळीयेसाठी रवाना झाले.

त्यानंतर साधारणः दीड ते दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःखात बुडालेल्या तळीयेवासियांचं सांत्वन करत धीर दिला.