The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई : नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही शिवसेनेवर (Shivsena) जोरदार प्रहार केला आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conferance) बोलताना आठवले यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला; मात्र त्यांना त्याचे फळ मिळेल असे सांगतिले आहे.

आठवले म्हणाले की, भारतीय जनता पक्षासोबत (Bjp) सेनेने (Shivsena) निवडणूक लढवली पण नंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचे विधान त्यांनी केले आहे.

तसेच येणाऱ्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही युती करणार असल्याचे सांगतानाच मुंबईतून शिवसेनेच्या हातातून सत्ता घेण्याचं आमचे लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

त्याचसोबत या वेळी भाजप आणि आर पी आय एकत्र येऊन मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचेही आठवले म्हणाले. लोकांच्या मनात नरेंद्र मोदी (narendra modi) आहेत त्याचमुळे चार राज्यात भाजपचा विजय झालाय. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे २०२४ मध्ये ४०० हुन अधिक एनडीए जागा जिंकेल असा दावा आठवले यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पडावा मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या टिकेलाही आमचा पाठिंबा असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत. मात्र हिंदुंनी मंदिरात भोंगा लावन्याला विरोध नाही, पण जाणीवपूर्वक मशिदी पुढे भोंगे लावून तणाव निर्माण करू नये, मशिदी वरून भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला मात्र विरोध असल्याच आठवले यांनी स्पष्ट केले आहे.