Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची शेती महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्ह्यात केली जाते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे.

दरम्यान यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला उठाव नसल्याने तसेच वायदे बंदी असल्याने आणि स्टॉक लिमिट मुळे देखील सोयाबीन बाजार भाव दबावत होते. मात्र आता केंद्र शासनाने सोयाबीन व सोयातेलावरील स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने सोयाबीन बाजारभावात वाढ होत असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोयाबीन व सोयाबीन तेलावरील स्टॉक लिमिट काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत सोयाबीन व सोयातेलावर स्टॉक लिमिट लादले होते. मात्र आता खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित आल्या असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून स्टॉक लिमिट काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून सोयाबीन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात मोठी बातमी आहे.

आज राज्यातील केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसी मध्ये सरासरी बाजार भाव 5300 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4700 प्रति क्विंटल ते 5,430 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

निश्चितच सोयाबीनच्या किमतीत आता वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज चार नोव्हेंबर रोजी या एपीएमसी मध्ये सोयाबीनची 149 क्विंटल एवढी आवक झाली. आज झालेल्या लिलावाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4,200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5252 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज सोयाबीन लिलावासाठी महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय बाजारपेठ अर्थातच कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4625 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5310 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5125 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच नागपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 5272 क्विंटल एवढी लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5402 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5151 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये आज 1600 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4655 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5725 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5190 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण भारतात ओळखले जाणारी लातूर एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली आहे. या एपीएमसी मध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची जवळपास १९५६९ क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5615 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४३० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज चार नोव्हेंबर रोजी अकोला एपीएमसी मध्ये 7578 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5535 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसी मध्ये आज चार नोव्हेंबर रोजी 2050 क्विंटल एवढी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४०५० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5665 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५३०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज झालेल्या लिलावात 594 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5351 रुपये प्रतिकून ठेवले एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५२०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज चार नोव्हेंबर रोजी केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 435 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 4951 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५३०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमरखेड एपीएमसीमध्ये आज चार नोव्हेंबर रोजी 800 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 1160 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज चार नोव्हेंबर रोजी मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 हजार 68 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5425 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 12 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.