Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलवर लावलेले स्टॉक लिमिट काढले असल्याने सोयाबीन दरात वाढ होत आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की केंद्र शासनाने 2021 मध्ये तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावले होते. सदर स्टॉक लिमिट 31 डिसेंबर 2022 पर्यंत लावण्यात आले होते. खरं पाहता स्टॉक लिमिट खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी लावण्यात आले होते. दरम्यान आता खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित आल्या असल्याने केंद्रशासनाने स्टॉक लिमिट काढले असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

स्टॉक लिमिट केंद्रशासनाने लावले त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित झाल्या असल्या तरी देखील याचा विपरीत परिणाम सोयाबीन दरावर झाला. त्यामुळे सोयाबीन समवेतच मुख्य तेलबिया पिकांचे भाव गडगडले. मात्र आता केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढली असल्याने सोयाबीनसमवेत सर्व मुख्य तेलबीया पिकांचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान 2021 मध्ये सेबीच्या सल्ल्याने केंद्रशासनाने वायदा बाजारातील सोयाबीन सौद्यावर बंदी घातली. यामुळे देखील सोयाबीन बाजारावर विपरीत परिणाम झाला आणि सोयाबीन दर जे की दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिरावले होते ते तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले.

दरम्यान आता सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी वाढली असल्याने आणि केंद्र शासनाने तेलावर तसेच तेलबिया पिकांवर असलेले स्टॉक लिमिट काढले असल्याने सोयाबीन बाजारभावात सुधारणा होत आहे. काल झालेल्या लिलावात राज्यातील सोलापूर एपीएमसी मध्ये सोयाबीनला तब्बल साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊ पाहत आहे.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत असून काही जाणकार लोकांनी सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळणार असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना काही जाणकार लोकांनी सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी निश्चित करून सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहण्याचा सल्ला दिला आहे.