10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Job : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेने एक पदभरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल अडीचशे रिक्त पदे भरली जाणार आहेत.

विशेष बाब म्हणजे आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली आहे. या अधिसूचनेनुसार या रिक्त पदांची भरती ही सरळ मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीने होणार आहे.

यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आज आपण नेमक्या कोणत्या पदासाठी भरती होणार आहे, यासाठी आवश्यक पात्रता आणि इतर माहिती याबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणवीस जमा करणार 2 हजार, ‘या’ आहेत योजनेच्या अटी, पहा…..

कोणत्या पदासाठी आहे भरती?

आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे गेट मन या पदासाठी भरती जाहीर करण्यात आले आहे. या रेल्वे गेटमन पदाच्या तब्बल 250 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून आता भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र उमेदवाराला एकदा अधिसूचना वाचावी लागणार आहे.

हे पण वाचा :- रेशन कार्डचा फॉर्म कसा भरायचा? पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस; Ration Card फॉर्मही डाउनलोड करा !

आवश्यक वयोमर्यादा?

या पदासाठी कमाल 54 वय असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

अर्ज कसा करावा लागेल

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांना करावा लागणार आहे.  

मुलाखत कुठं होणार

रेल्वे गेटमन या पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीने निवड केली जाणार आहे. एमआयआरसी, अहमदनगर या ठिकाणी 25 एप्रिल ला मुलाखत होणार आहे.

किती मिळणार पगार?

रेल्वे गेट मन पदासाठी 31,500 ते 32000 दरम्यान पगार राहणार आहे.

हे पण वाचा : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटसाठी ‘या’ तारखेपर्यंत विशेष मोहीम; लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन