10वी पास, ग्रॅज्युएट तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स विभागात निघाली ‘या’ पदासाठी भरती, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जीएसटी आणि कस्टम्स विभाग पुणे झोन येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. या रिक्त पदासाठी 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएट उमेदवार पात्र राहणार आहेत.

दरम्यान जीएसटी आणि कस्टम विभागाकडून या पदभरतीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! भारतात एक व्यक्ती किती बँक खाते ओपन करू शकते? काय आहेत सरकारी नियम

कोणत्या पदांसाठी होणार आहे भरती?

कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार या तीन पदांच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या विभागात या तिन्ही पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कर सहायक या पदाच्या दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, स्टेनोग्राफर ग्रेड-II या पदाच्या सहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि हवालदार या पदाच्या तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

कर सहायक पदासाठी ग्रॅज्युएट उमेदवार पात्र राहणार आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड-II बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत आणि हवलदार अर्थातच कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा पदभरतीची जाहिरात मात्र वाचावी लागणार आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय, मिळणार मोठा आर्थिक लाभ, पहा डिटेल्स

किती पगार मिळणार

स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहायक : 25500 ते 81100

हवालदार : 18000 ते 56900

अर्ज कसा करावा लागणार

इच्छुक आणि पात्र उमेदवाराला आपला अर्ज विहित नमुन्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज भरल्यानंतर आपला अर्ज सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन : 41-ए, ससून रोड, समोर. वाडिया कॉलेज, पुणे 411 001 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज 24 मे 2023 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

या पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन भरती 2023 या लिंक वर क्लिक करा. 

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..