नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार, मार्च 2025 मध्ये होणार निर्णय, समोर आली नवीन आकडेवारी

सध्या 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना 53% डीएचा लाभ मिळत आहे. आता पुढील DA जानेवारी 2025 पासून वाढवला जाणार आहे, जो AICPI निर्देशांकाच्या सहामाही डेटावर अवलंबून असेल. जुलै ते डिसेंबर या महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शन धारक 53 टक्के महागाई भत्ता कधीपासून लागू होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. येत्या काही दिवसांनी नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून या संदर्भात निर्णय होणार आहे.

असे असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर, AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे DA/DR दर केंद्र सरकार दरवर्षी दोनदा सुधारित करत असते.

ही वाढ दरवर्षी जानेवारी/जुलैपासून केली जाते. वर्ष 2024 बद्दल बोलायचे तर, जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 4% आणि जुलै पासून 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला. त्यानंतर DA 53% झाला आहे. दरम्यान, आता पुढील वाढ जानेवारी 2024 पासून होणार आहे, ज्याची घोषणा नवीन वर्षात सादर होणाऱ्या बजेटनंतर होण्याची शक्यता आहे.

खरे तर दरवर्षी केंद्रातील सरकार मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढ होत असते. यानुसार जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय मार्च 2025 मध्ये होऊ शकतो. ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात येणार आहे.

सध्या 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना 53% डीएचा लाभ मिळत आहे. आता पुढील DA जानेवारी 2025 पासून वाढवला जाणार आहे, जो AICPI निर्देशांकाच्या सहामाही डेटावर अवलंबून असेल.

जुलै ते डिसेंबर या महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की आत्तापर्यंत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी पाहिली असता AICPI निर्देशांक क्रमांक १४४.५ आणि DA स्कोअर ५५.०५% वर पोहोचला आहे, अशा परिस्थितीत DA मध्ये ३% वाढ होण्याची खात्री आहे. पण अजून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे आलेले नाहीत. यामुळे जेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आकडे समोर येतील तेव्हाच प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.

परंतु आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता एवढे स्पष्ट झाले आहे की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किमान तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नव्या वर्षात 56% पर्यंत पोहोचणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe