7th Pay Commission : ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; यावर्षी कर्मचाऱ्यांना मिळणार 42 टक्के दराने महागाई भत्ता, वाचा यामागील सत्यता

7th Pay Commission : मित्रांनो महागाई दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांसमवेतच कर्मचाऱ्यांचे देखील मोठे हाल झाले आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये वाढ देण्यात आले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून चार टक्के इतकी महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के दराने महागाई भत्तेचा लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार महागाई भत्ता मध्ये वाढ व्हावी अशी मागणी केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्ट मध्ये लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सदर मीडिया रिपोर्टनुसार महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.

अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील वाढवणे अनिवार्य आहे. महागाईचा विचार करता 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. जानेवारी 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 42 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे त्यामध्ये अजून चार टक्के महागाई भत्ता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्यास आणि महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाल्यानंतर मात्र महागाई भत्ता शून्य केला जातो. मित्रांनो, महागाई भत्ता मध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणजेच सध्या 2.57 पट एवढा फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून फिटमेंट फॅक्टर 3.68 पट होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान फिटमेंट फॅक्टर मध्ये एवढी वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तसेच राज्य कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात देखील वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट पर्यंत वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 26000 तर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000 होणार आहे.

असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या घर भाडेबत्त्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. निश्चितच वाढत्या महागाईचा विचार करता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येऊ शकते. सदर मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर निश्चितच पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.