जर शासनाने ‘हा’ निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार दुपटीने वाढ ! वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक मोठी बातमी हाती येत आहे. खरं पाहता, केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञय केला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना या वाढीमुळे 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार आहे. निश्चितच यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट मोदी सरकार देणार आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! सीआरपीएफ मध्ये होणार तब्बल 1 लाख 30 हजार रिक्त पदांची भरती, ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

जस की आपणास ठाऊकच आहे की, आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केली जाऊ शकते.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दुपटीने वाढेल असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टरचा आढावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र फिटमेंट फॅक्टर मध्ये दिली जाणारी वाढ ही 2023 मध्ये दिली जाणार नाही तर 2024 मध्येच दिली जाणार आहे. 

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच! शिंदे-फडणवीस सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली मोठी वाढ; 1 एप्रिल पासून वेतन वाढीचा निर्णय लागू

किती वाढणार पगार?

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे सर्वस्वी फिटमेंट फॅक्टर वर आधारित असते. यामुळे जर फिटमेंट फॅक्टमध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होते आणि साहजिकच यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ शक्य आहे. जस की आपणास ठाऊकच आहे गेल्यावेळी फिटमेंट तब्बल मध्ये वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे तब्बल अडीच पट वाढले होते.

यामुळे याही वेळी या फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. वास्तविक सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे यात 3.68 पर्यंत वाढ केली जाणार आहे. पगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000 हजार रुपये असेल तर 2.57 फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सदर कर्मचाऱ्याच वेतन हे 46260 रुपये बनत. मात्र जर 3.68 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सदर कर्मचाऱ्यांचे वेतन हे 95 हजार 680 रुपयांपर्यंत जाईल. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार भरती, पहा डिटेल्स