राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी..! महागाई भत्ता वाढीची तारीख डिक्लेर झाली ; ‘या’ दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने DA

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणजेच केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जातो.

पहिल्यांदा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात दिला जातो. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला असला तरी देखील राज्य कर्मचाऱ्यांना अजून 34 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार DA वाढीची मागणी केली जाऊ लागली आहे. दरम्यान आता या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले जात आहे.

खरं पाहता राज्य कर्मचाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात ओ पी एस योजना आणि महागाई भत्ता वाढीबाबत राज्य शासन निर्णय घेईल अशी आशा होती. निदान यावर चर्चा होईल आणि काहीतरी सकारात्मक आश्वासन राज्य कर्मचाऱ्यांना मिळेल असं वाटतं होते.

मात्र तसं काही झालं नाही, राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीएस लागू करण्यासाठी राज्य शासन अक्षम असल्याचे सांगितले. तसेच महागाई भत्ता वाढीबाबत हिवाळी अधिवेशनात चर्चाचं झाली नाही. दरम्यान आता 38 टक्के दराने महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

म्हणजेच, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार आहे. अर्थातच आता राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने जो महागाई भत्ता मिळत आहे त्यामध्ये 4 टक्के वाढ होईल आणि 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल. याशिवाय ही महागाई भत्ता वाढ जुलै (2022) महिन्यापासून लागू होईल.

म्हणजेच ज्यावेळी राज्य कर्मचाऱ्यांना या डीए वाढीचा लाभ मिळेल त्यावेळी याची थकबाकी देखील राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. खरं पाहता, राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांकडून डी ए वाढीसाठी शासनाला निवेदनेत देण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून डीए वाढीची घोषणा जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.