आदमापूरच्या बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूक; शेतीसाठी कसं राहणार हे साल, पाणी पाऊस कसा राहणार? कृष्णा डोणे वाघापूरकर यांची भाकणूक, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadmapur Balumama Bhaknuk : दरवर्षी आदमापुरच्या बाळूमामा भंडारा उत्सवात आदमापुर तालुका भुदरगड या ठिकाणी भाकणूक केली जाते. यामध्ये महाराष्ट्रापासून देशापर्यंत आणि देशापासून जगापर्यंत राजकीय, शैक्षणिक, शेती विषयक, हवामान विषयक अशा इत्यादी पैलूंवर या भाकणुकीत भाष्य केलं जातं. येणार साल कस राहणार याबाबत भाकणुकीत अंदाज बांधला जातो.

राज्यासह संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील देवालयात सालाबादप्रमाणे याही वर्षी भाकणूक झाली आहे. यामध्ये शेतीपासून ते राजकारणापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर भाकणूककार कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी भाकणूक सांगितली आहे. अशा परिस्थितीत आज आपण डोणे महाराजांनी सांगितलेली भाकणूक सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

आदमापुर बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूकमधील शेतकऱ्यांसाठी झालेली भाकणूक (Aadmapur Balumama Bhaknuk)

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील, उसाचा भाव चार हजारावर जाईल, उसाचा काऊस होईल, उसाच्या कांड्यांचा अन दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता या भाकणुकीत वर्तवण्यात आली आहे. तसेच व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबाडणूक करेल अन शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल असं देखील यामध्ये सांगण्यात आल आहे.

ऋतुचक्रात बदल होईल बारा महिने पाऊस होईल आणि जलप्रलय होतील असं या भकणुकीत सांगितलं गेलं आहे. शेतकऱ्यांना कसं पीक होईल, पीक पाणी कसं राहील याबाबत या भावनुकीत दिलेल्या माहितीनुसार, दिड महिन्याच धान्य मुबलक प्रमाणात पिकणार आहे.

हे पण वाचा :- सावधान ! अवकाळीच संकट अजून गेलं नाही; नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘इतके’ दिवस पाऊस पडणार

येणारा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहणार असून खरीप पीक चांगले येणार आहे. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकेल असं या भागणुकीत म्हटलं आहे. सोबतच गव्हाची शेती मध्यम पिकणार ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. जनावरांच्या वैरणीचे भाव वाढणार आहेत.

याचा परिणाम म्हणून वैरण अन धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या वाढतील असं सांगितलं गेलं आहे. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. या काही महत्त्वाच्या गोष्टी भाकनुकीमध्ये शेती संदर्भात नमूद करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित