दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यासारख्या एक ना अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे.

यंदा देखील मान्सून आगमनास जवळपास आठ ते दहा दिवसांचा उशीर होत असल्याने दुष्काळाची धोक्याची घंटा वाजली आहे. 2021 मध्ये तसेच या चालू वर्षात अर्थातच 2023 मध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

2021 आणि 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला होता. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपिट पाहायला मिळाली.

दरम्यान या कालावधीत नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. 5 जून 2023 रोजी या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. 

हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील 39 हजार 363 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 32 कोटी 54 लाख 14 हजार रुपयाची रक्कम मंजुर करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळणार एवढे नक्की.

हाती आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये जिल्ह्यातील दारव्हा, पुसद, उमरखेड, आणि पांढरकवडा या चार तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बहुतांशी शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या कालावधीमध्ये या संबंधित तालुक्यातील 26 हजार 833 शेतक-यांचे 22,782.10 हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले होते.

अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले आणि प्रशासनाने मदतीचा अहवाल शासनाकडे वर्ग केला आणि आता 5 जून रोजी यासाठी शासनाने 22 कोटी 80 लाख 4 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

याशिवाय या चालू वर्षात अर्थातच मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये गारपिट व अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! भात पिकासाठी ‘या’ कंपनीने विकसित केलं पावरफुल तणनाशक, शेतकऱ्यांच्या खर्चात होणार मोठी बचत, वाचा…

या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाभुळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा या 13 तालुक्यातही शेतकऱ्यांचे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.

अशा परिस्थितीत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. यात भाजीपाला, उन्हाळी ज्वारी, तीळ या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये या संबंधित भागातील एकुण 12,530 शेतक-यांचे 5697 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. दरम्यान पाच जून 2023 रोजी या कालावधीत या संबंधित भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाने मदत म्हणुन 9 कोटी 74 लाख 10 हजार रुपये निधी मंजुर केला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात मिळणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…