शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! SBI कृषी ड्रोन खरेदीसाठी देणार लोन ; ‘या’ अग्रगण्य ड्रोन निर्माता कंपनीसोबत झाला करार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. आता देशातील कृषी क्षेत्रात ड्रोन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे कृषी ड्रोनला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर देशातील अग्रगण्य बँका आता ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हेतू कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश असून आता स्टेट बँक ऑफ इंडिया देखील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असून यासाठी एसबीआयने एका प्रमुख ड्रोन निर्माता कंपनीसोबत करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख ड्रोन निर्माता कंपनी आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशन ने एसबीआय सोबत भागीदारी केली आहे.

यावेळी या आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशन कंपनीने एसबीआय कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शासकीय योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार अशी माहिती दिली. एवढेच नाही तर या भागीदारीमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीच्या ग्राहकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देईल अशी या कंपनीचे सहसंस्थापक दीपक भारद्वाज यांनी माहिती दिली.

दरम्यान दीपक भारद्वाज यांनी कृषी ड्रोन भारतीय शेतीसाठी वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. शिवाय एसबीआयच्या कर्ज पुरवठ्यामुळे कृषी ड्रोन खरेदी करणे शेतकऱ्यांना सोयीचं होणार असल्याच त्यांनी नमूद केलं. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशन या कंपनीने तयार केलेले एग्रीबोट ड्रोन देशातील पहिले डीजीसीए टाईप सर्टिफिकेशन प्राप्त केलेले ड्रोन ठरले आहे.

हे सर्टिफिकेट या कंपनीला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहे. दरम्यान, ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ड्रोनमुळे फवारणीसाठी कमी वेळ खर्च होईल तसेच शेतकऱ्यांचा पैसा देखील वाचणार आहे. यामुळे विद्राव्य खतांचा अपव्यय टाळणार आहे. परिणामी जमिनीची सुपीकता अबाधीत राखण्यास मदत होईल.

साहजिकच यामुळे उत्पादनात वाढ होईल, शिवाय शेतकऱ्यांचे आरोग्य देखील यामुळे धोक्यात येणार नाही. उत्पादनात वाढ, उत्पादन खर्चात बचत आणि शेतकऱ्यांचे आणि जमिनीचे आरोग्य यामुळे अबाधित राखण्यास मदत होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. निश्चितच आता कृषी ड्रोन भारतीय शेतीमध्ये मोलाची भूमिका निभवणार आहेत. अशा परिस्थितीत कृषी ड्रोन खरेदीसाठी एसबीआय सारख्या प्रमुख बँका देखील पुढे सरसावल्या असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Wheat Crop Management : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! गहू पिकावर आला ‘हा’ भयंकर रोग, असं मिळवा नियंत्रण, नाहीतर……