अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू शेतीतून मिळवल एकरी 12 क्विंटल सोयाबीन, अन गव्हाचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Farmer : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी अवकाळी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बागायती भागातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे अनेक नवयुक्त तरुणांनी आता शेतीला रामराम ठोकत इतर व्यवसायांमध्ये नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतीमध्येच आपल भवितव्य शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

वेगवेगळ्या संकटांचा सामना करून शेतकरी बांधव आता शेतीमध्येच नवनवीन प्रयोग करत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असाच एक कौतुकास्पद प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याने आपल्या जिद्दीने आणि शासनाच्या योजनेचा लाभ घेत आपली कोरडवाहू शेती बागायती करत शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पडले पुढे ! OPS योजनेबाबत झालं ‘हे’ महत्वाचं काम, वाचा सविस्तर

राहता तालुक्यातील मौजे चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे पूर्वी कोरडवाहू शेती करत होते. शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता नव्हती. यामुळे शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नव्हती. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील अहिराणी वर आला होता.

यामुळे अर्जुन व कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवण्यास मजबूर होते. परंतु 2021 मध्ये अर्जुन यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत विहीरीसाठी त्यांना अनुदान मिळाले. यामुळे सिंचनाची शाश्वत उपलब्धता झाली. यामुळे कोरडवाहू क्षेत्र आता बागायती झाले आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट झाली रद्द; पण……

खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन या पिकाची शेती केली होती आणि यातून त्यांना तब्बल एकरी बारा क्विंटल चे उत्पादन मिळाले आहे. शिवाय रब्बी हंगामात गहू या नगदी पिकातून त्यांना 12 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यांच्याकडे 0.75 हेक्टर जमीन असून ही जमीन आता बागायती झाली आहे.

शेत जमीन बागायती झाली असल्याने त्यांना शेतीतून चांगली कमाई होत असून शासनाच्या योजनेचा जर गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर कसा बदल होऊ शकतो याचे एक ज्वलंत उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर