जुलै महिन्यात बँका ‘इतक्या’ दिवसांसाठी बंद राहणार ! तुमच्या शहरातील बँकेला किती दिवस सुट्टी राहणार?

पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जर बँकेशी निगडित कामे करायची असतील तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की जुलै महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? याचीच माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

Published on -

Bank Holiday In July : जून महिना आता संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दहा दिवसात जून महिना संपला आणि त्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्हाला जुलै महिन्यात बँकेत जाऊन काही आवश्यक कामे करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की जुलै महिन्यात बँकांना बरेच दिवस सुट्टी राहणार आहे. जून महिन्याप्रमाणेच जुलैमध्ये देखील बँका काही महत्त्वाच्या सणांच्या दिवशी आणि साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने बंद राहणार आहेत.

आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार जुलै महिन्यात देशभरातील बँका 13 दिवसांसाठी बंद राहतील. मात्र, या सुट्ट्या राज्यांनुसार बदलणार आहे.

म्हणजेच सर्वच राज्यांमध्ये बँका 13 दिवसांसाठी बंद राहणार नाहीत. अशा परिस्थितीत आता आपण राज्यनिहाय जुलै महिन्यात बँका किती दिवसांसाठी बंद राहणार याची माहिती जाणून घेणार आहोत.

जुलै महिन्यात बँका या तारखांना बंद राहणार 

जुलै 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी मोठी आहे. जुलै महिन्यात जवळपास 13 दिवसांसाठी बँकांना सुट्टी राहणार आहे. 6 जुलै, 13 जुलै, 20 जुलै आणि 27 जुलै रोजी रविवार निमित्ताने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

याशिवाय बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुद्धा बंद राहतात. 12 आणि 26 जुलै 2025 रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

तसेच, 3 जुलै रोजी आगरतळामध्ये खारची पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. 5 जुलै रोजी गुरु हरगोबिंद जयंती निमित्त काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.

14 जुलै रोजी ‘बेह देंखलाम’, 16 जुलैला ‘हरीला सण’, तर 17 जुलैला ‘यू तिरोट सिंह पुण्यतिथी’ निमित्ताने काही राज्यांतील बँका बंद राहतील. 19 जुलै रोजी पुन्हा एकदा आगरतळामध्ये ‘केर पूजा’मुळे सुट्टी असेल. याशिवाय, 38 जुलै रोजी गंगटोकमध्ये ‘द्रुकपा त्से-जी’ च्या निमित्ताने बँका बंद राहतील.

त्यामुळे बँकिंग व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी पुढील महिन्यात बँकेची संबंधित कामे करताना हे वेळापत्रक लक्षात ठेवावे. या वेळापत्रकानुसारच आपली महत्त्वाची कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!